अलर्ट मुंबईकर

Started by केदार मेहेंदळे, November 14, 2011, 11:41:37 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

बॉम्ब स्केअर नंतर मुंबैकर अलर्ट झाले आहेत. पण कधी कधी  एखद्या नवीन माणसाला गर्दी नको तिकडे उतरवते, त्या मांसाच पण नुकसान होत अन मग काय प्रसंग उभा रहातो त्याच वर्णन करण्याचा प्रयत्न आहे.  


गाडी आली, चढा त्वरित,
ढकलून सर्वांना,
पडेल कोणी, मरेल कोणी,
फिकीर त्याची कोणा?
 
पकडा विंडो बसावयास,
दुसरी, तिसरी सीट,
नातरी चौथ्या सीटला हळूच,
टेकवा जरासे बुड.

ब्यागा  ठेवा, उघडा पुस्तक,
मासिक, पेपर, फोन.
नातरी मान टाका खाली,
झोपा  शांत निवांत.

आले पुढले स्टेशन झाला,
गोंधळ कसला दारात?
कोण हा येडा, मधेच अडला,
आला नवीन शहरात.

उतरवा इथेच या साल्याला,
आला हा कशास?
आधीच गर्दी मरणाची अन,
हा अडला दारात.

सुटली ट्रेन, स्वस्थ सर्वहि,
कोणी पेंगले सहज.
अचानक कोणा नजरेस आली,
लावारिस पडली ब्याग.

उडाला गोंधळ, विचारा, शोधा,
कोण याचा मालक?
नातरी त्वरित खेचा चेन,
थांबवा गाडी मधेच.

येता स्टेशन उड्या मरती,
चालत्या गाडीतून.
जीव वाचवण्या स्वतःचा पळती,
ढकलून आपल्या मित्रास.

पोलीस आले, तपास करण्या,
ब्रेकिंग न्यूज टीव्हीला.
फोन वाजती सर्वांचे खणखण,
जाणण्या आप्त सुखरूप.

आले पथक, बॉम्ब शोधक,
घेऊन कुत्रे चार,
उचलता ब्याग घबराट पसरली,
पांगले सर्वही दूर.

उघडता पिशवी, दिसले केवळ,
कपडे जुने चार.
जीव वाचला, चला पळा,
पकडा विंडो सीट.

त्या अवेळी, अनोळखी त्या,
स्टेशन वरी   अंधारात,
बसला होता पकडून डोके,
हरवले त्याचे सामान.

मुंबई..... लोकल..... गर्दी,
त्याने पाहीले प्रथमच.
उतरायचे न्हवते जरी इथे,
गर्दीने लोटला त्यास.

लांब गावहून आला बिचारा,
शोधण्या शहरात काम.
पिशवी राहिली, गेली गाडी,
घेऊन त्याचे समान.




केदार...

amoul

khup chhan prasang mandala  aahe .... mast

Pravin5000