---- कुणाला नोकरी आहे ----

Started by सूर्य, November 14, 2011, 04:45:37 PM

Previous topic - Next topic

सूर्य


तशी आता जगायाला मनाची खातरी आहे
मराठी बांधवांची ती मराठी बासरी आहे.


नका, जावा ,तसे तुम्ही मनाचे फार मोठे हो
लहाण्याला करा मुजरा असा बाबा घरी आहे .


मनाने घट्ट झालेलो तसा मी वेगळा होतो
भुकेला आग लावावी, उपाशी बाजरी आहे .


मि बोलावे नि ऐकावे कसे शब्दात सांगावे !
तुझ्या अश्रुत जे सारे तुझ्या ओठावरी आहे ..


निघाला येथला लाव्वा नदीच्या पार जाण्याला ,
नदीचा डोह आजारी तसा मनका तरी आहे.


करा उपकार थोड़े ह्या गरीबाच्या घराण्याचे ,
नसे धंदा जरी येथे कुणाला नोकरी आहे .



ज्ञानदीप सागर ..