खरच, खूप मस्त वाटतंय ............

Started by tinkawithyou, November 18, 2011, 12:22:04 AM

Previous topic - Next topic

tinkawithyou

दिवसभर कामात भरकटलेल मन..कस तृप्त करायचं त्याला?
  विचार करत बसते ना बसते, एवढ्यात नजर खिडकी बाहेर वळते,
  फक्त मी..... आणि वर ते अथांग पसरलेले आकाश
  त्याच्या कवेत असलेल्या चंद्र आणि चांदण्याचे चोरून खेळ पाहत असताना  ;)
  खूप मस्त वाटतंय
  मळंप सार निघून गेलय आता मनातल आणि अबोल भावना साठतेय
  खरच, खूप मस्त वाटतंय ............
 
  चंद्राने एका चांदणी बरोबर हितगुज करताना दुसरीला येणारा राग,
  मग थोड्याच क्षणात तीच तिथून हळू हळू नाहीस होण 
  जस प्रेयसी न तिच्या प्रियकरावर खोट खोट रागवण?
  मग चंद्र हि लबाड हळू हळू ढगांच्या मागून पळतो
  चांदणी जिथे रागावून बसलीय, तिला तिथे जाऊन छळतो  ;)
  खूप मस्त वाटतंय
  प्रियकराने मागितलेली माफी पाहून तीच सौंदर्य अधिकच वाढतंय
  खरच, खूप मस्त वाटतंय ............
 
  अरे आपला लाडका मित्र चंद्र आताच तर नभी उगवला
  नजरचूक होताच क्षणात कुठे हरवून गेला
  त्याला शोधण्यासाठी चांदण्यांनी अशा जमवल्या रांगा 
  जस फुला मधील मध शोधण्यात मग्न असतो भुंगा
  खूप मस्त वाटतंय
  जशी प्रेयसी समोर प्रिय मैत्रीण अचानक रस्यात येऊन भेटतेय  ;)
    खरच, खूप मस्त वाटतंय ............
 
  प्राजक्ता
 

केदार मेहेंदळे