व्वाह रे जिंदगी

Started by शिवाजी सांगळे, September 30, 2025, 06:14:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

व्वाह रे जिंदगी

खुप रहस्ये घेऊन जेव्हा असते जिंदगी
मनातल्या मनामधे तेव्हा हसते जिंदगी

कमतरता नाही भोवती येथे पारंगतांची
अमिषांना त्यांच्या सहज फसते जिंदगी

होऊन करता चांगुलपणा, अंगाशी येतो
धरून डोके आपलेच मग बसते जिंदगी

धावते,थकते रात्रंदिन न् लगेच जाणवते
खिजगणतीत कुणाच्याच नसते जिंदगी

वारंवार येता वाट्याला, सुन्न हताशपणा
स्वतःलाच रे 'शिव' सतत डसते जिंदगी

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९