मोकळी वाट

Started by काव्यमन, November 22, 2011, 05:04:08 PM

Previous topic - Next topic

काव्यमन

मोकळी वाट
मनात उदभवलेल्या पोकळीत
विचारांचे काहूर माजले
कुठलीच वाट मोकळी दिसेना
मोह पाशाच्या या जगात
जीव सुटता सुटेना
नाती-बंधनांनी जखडलेल्या मनाला
मोकळा काही होता येईना
श्वास घेणे आता एवढेच उरले
जीव असता जगता येईना
म्हणोनी आता करू प्रवास शेवटचा
पण कुठलीच वाट मोकळी दिसेना
                           -काव्यमन

केदार मेहेंदळे