मित्र

Started by sandhya09, November 26, 2011, 12:20:52 PM

Previous topic - Next topic

sandhya09

मैत्री कि प्रेम
कधी कधी वाटतो फक्त एक गेम


मित्र म्हणून माझ्या सर्व थट्टा कबुल करतेस
पण माझ प्रेम जाणवताच मागे का सरतेस


मित्र म्हणून मला सर्व सांगायला तयार असतेस
मग प्रेम माझ्यावरच माझ्यापासूनच का लपवतेस


कसली भीती आहे तुला आपल्या नात्यामध्ये
प्रियकर का नको तुला एका मित्रामध्ये


मित्र म्हणून सांग मी किती दिवस वाट पाहू
तुला मिठीत घेऊन रडण्यास आसुसलेत माझे बाहू


"तुझीच मी" या शब्दांची वाट पाहतो
एकदा तरी तुला विचारेन म्हणतो


वाटते भीती मी जर पुढे आलो
मित्राची काही बंधन विसरलो


तर आपण पुन्हा असू  सोबत का?
मी एक चांगला मित्र नि जीवनसाथी होऊ शकतो का?


पण नको मी वाट पाहीन तुझ्या एका इशाऱ्याची
करून घेऊन सवय मी आतल्या आत जुरण्याची


कारण तू मित्र मानलस तरी चालेल मला
जेणेकरून तुझ्यासोबत असण्याचा एक बहाणा तरी मिळेल मला


संध्या पगारे











अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.

madhura

khup ch chan....मैत्री कि प्रेम ? me suddha yaach vicharat ahe :)

shardul

अप्रतिम आहे. ....प्रेम कशाला म्हणतात तेच हल्ली मला कळत नाही

sandhya09

अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.

Pravin5000

mast.... chan aahe kavita...... :)

केदार मेहेंदळे

कारण तू मित्र मानलस तरी चालेल मला
जेणेकरून तुझ्यासोबत असण्याचा एक बहाणा तरी मिळेल मला


khup mast..... chan