हिरवी किनार

Started by केदार मेहेंदळे, November 28, 2011, 12:33:26 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
इथ पर्यंत पोहचलोच
तुझा हात धरून.
डोंगराचे चढ उतार अन
वाहत्या नद्या पार करून.

सुरवात केली चालायला
तेंव्हा सकाळ होती
अन आता.... मध्यांन संपून
चाहूल लागतेय संध्याकाळची.

दूरवर.....
नजरेच्या टप्प्यात
दिसायला लागलीय
एक हिरवी किनार
शांत.....

किती वेळा भरकटलो मी
हा रस्ता तुडवताना.
तू मात्र आणलसच  इकडेच
हताला धरून मला.

इकडेच पोहचायचं होत ना?
माहित होता रस्ता तुला हा
पण एकट यायचं न्हवत तुला.
म्हणून भटकत राहिलीस
माझ्या बरोबर.

आता मात्र सरळ चालायचं.
चढणी  नकोत अन नकोत उतरणीही.
आता  काही मिळवण्याची धडपडही  नको.
त्या हिरवाईवर नजर ठेऊन
चालत रहायचं शांत पणे
तुझा हात धरून.

त्या शांत हिरवळीत
ऐकायचे शब्द न बोलता
एकमेकांच्या सहवासात
शांत नदीच्या किनारयावर.

त्या नदीतून वहात  येतील
काही फांद्या न वेली
इकडच्या किनाऱ्या वरून.
पण आपण नुसत्या बघायच्या त्या.
अडवायच्याही नाहीत अन
गुंतायचंही  नाही त्या आठवणींत.
जाऊन द्यायच्या  वाहत त्या
दूर...दूर....दूर...



केदार....

amoul

अडवायच्याही नाहीत अन
गुंतायचंही  नाही त्या आठवणींत.
जाऊन द्यायच्या  वाहत त्या
दूर...दूर....दूर...

kya baat hai........  khara  soukhya  tar  hech asta