हृदय नि रूप???????????

Started by p27sandhya, November 29, 2011, 09:53:18 AM

Previous topic - Next topic

p27sandhya





आज खूप वाद घेतला देवाशी
असा दुजापणा का केलास माझ्याशी 

सावल्या रंगात थोडीशीच भर घातली असतीस
मला अजून थोडीशी गोरी केली असतीस 

तर आज तो मला नाही म्हणाला नसता
त्याच्या प्रेमावर माझा अधिकार असता

आई मला तुला काही तरी सांगायचं 
तुझ्या कुशीत शिरून खूप खूप रडायचं 

त्याला मैत्रीण म्हणून पसंद आहे
पण जीवनासाथी म्हणून फक्त थोडी रंगाची कमी आहे 

आई म्हणाली का बर कोणासाठी रडतेस तू
ज्याला जाण नाही खरया प्रेमाची त्याच्यासाठी स्वतःला कमी लेखतेस तू 

त्याला हवी तितकी तू सुंदर गोरीपान असतीस  तर तो हि हो म्हणाला असता
पण हे रूप उद्या  नसलं तर तो तुझ्या सोबत असता? ???   

अरे आज त्याने जरी एका सुंदर मुलीशी लग्न जुळवल आहे 
पण लक्षात माझ्या मुलीचे  मधाहून गोड आणि पाण्याहून नितळ हृदय गमावलं आहे
संध्या पगारे