"आठवणी"चारुदत्त अघोर.©(२९/११/११)

Started by charudutta_090, November 29, 2011, 10:40:07 AM

Previous topic - Next topic

charudutta_090


ॐ साई
"आठवणी"चारुदत्त अघोर.©(२९/११/११)
हर येता क्षण मागे जातो...
मागे जाऊन...
मनी काही सोडून जातो;
काय सोडून जातो,
ते मनातच राहतं,
मग विचारांच वारं,
सैर वैरा वाहतं..
ते घडलेलं पुन्हा कधीच,
नाही घडत,
तरी मन ते विचार..
कधीच नाही सोडत;
घडल्या प्रसंगातून शिल्लक....
राहतात फक्त आठवणी,
जणू कसतात आवळून अनेक..
भावनिक गाठ्वणी,
बनतात स्वतः भूत काळ,
ज्या उभ्या स्थिततात..
बनून भूतं विक्राळ...
आसुरी हास्य स्मित्तात,
यांना नाही भविष्य कसले..
न कसले वर्तमान..
तरी मनास बनवतात
विचारी गतिमान,
कधी हसवतात खळाळून..
कधी रडवतात पिळावून,
पाणावतात डोळे
घळ घळ वाहून..
उमटतात खपलीत
गाली राहून,
किती या भावनिक आठवणी
तापी तपायच्या..
सगळ्याच आपल्या म्हणून..
किती जपायच्या,
जन्म जातो जपण्यात..
शेवटी काही नाही उरत..,
मण भर आठवणींना..
मुठभर हृदय नाही पुरत....!!!
चारुदत्त अघोर.


केदार मेहेंदळे

जन्म जातो जपण्यात..
शेवटी काही नाही उरत..,
मण भर आठवणींना..
मुठभर हृदय नाही पुरत....!!!



chan,,,,,