माझी सखी.... कविता

Started by केदार मेहेंदळे, December 05, 2011, 12:55:35 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 कशी अचानक कुठूनी
नकळे कधी अवतरली
राहिली येउनी रुधयी
कविता

दिसते मज दश दिशांना
भासते समिपच  माझ्या
स्पर्शते हवेतून मजला
कविता

वाटते येउनी शेजारी
बसलीशी खेटून मजसी
परी बघता नसे तिथे ती
कविता

झोपही न येते मजला
गुणगुणते ती कारण माझ्या
कानात निशब्द शब्दांच्या
कविता

लोक म्हणती झाला वेडा
दिसते म्हणे कारण याला
अन बोलतेही कानी याच्या
कविता

परी येता अव्यक्त रुपात
मी नटवितो  तिला शब्दांत
मग दिसते मजला सुंदर
कविता

कधी चंद्राहूनही शीतळ
कधी सुर्याहूनही  प्रखर
कधी वर्याहूनही अवखळ
कविता

कधी बरसे अश्रू बनुनी
कधी हसते निर्झर बनुनी
दाखवी मनाच्या लहरी
कविता

न भेटली जरी दिवसांत
मज अंतरी भीती सतत
गेलीका सोडून मजला
कविता?

मग होऊनी वेडापिसा
मी विनवतो शब्दांना
जा शोधून माझी आणा
कविता

ती येते  मग झुळूक बनुनी
कुजबुजते निशब्द कानी
अन सजते शब्द बनुनी
कविता



केदार...

amoul


shashaank


vaibhav joshi

khup chhaan kedarji. and thanks for the reply you give to mine.
vaibhav joshi


swatium