"आई...अस्तित्व तुझं...!"

Started by msdjan_marathi, December 05, 2011, 08:34:53 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(संक्षेप : आता पर्यंत खूप सा-या कविता लिहिल्या... पण आईवर कधी लिहिलेच नाही... वाटले खुपदा... पण काही ओळींत लिहू शकत नव्हतो आईसाठी...!  पण काहीच दिवसांपूर्वी माझ्या आईचं ऑपरेशन झालं... आणि  हौस्पीटलमध्ये असताना त्या काही क्षणांत माझ्या आयुष्यातलं तिचं अस्तित्व मला जाणवलं... तेव्हा जे काही मनात आलं ते इथे मांडण्याचा जेमतेम प्रयत्न करतोय...! काही शब्दांची सांगड चुकत असेल तर माफ करा...!)

  :-X "आई...अस्तित्व तुझं...!" :-X

    हौस्पीटलच्या त्या बेडवर आई तुला झोपलेलं मी पाहिलं...
आणि टचकन् तुझ्या पायावर माझ्या पापणीने पाणी वाहिलं..
भरून आला गळा...तुला कसं पुसावं कळलंच नाही...
'बाळा तू जेवलास का..?'... उलट तुचं मला पुसलं...
असह्य अशा ह्या वेदनेत आई तू आमचा विचार कसा ग करतेस..?,
माझं मन.... उत्तर हे शोधत बसलं...
कुंठीत बुद्धीत मात्र ती क्षमताचं नव्हती म्हणून लाचार होऊन हसलं...
झोपलेली तू असताना तुझ्या खरखरीत हाताला हातात धरलं...
भेगांभेगांत होतं आई तुझ्या पान्ह्याचं दूध जिरलं...
अशाच चिरा पायातही पाहून मन माझं खडबडलं...
शोधत होतो देव्हा-यात ज्याला त्या देवाचं दर्शन त्या चि-यात घडलं...
नकळतच मग तिझ्या गालावरल्या सुरुकुतीने मला वेडावलं...
खंगत चाललेलं पाहून तुझ्या काळजीने काळीज भेडसावलं...
मग मधेच तुझ्या केसातल्या त्या पांढ-याने मला खिजवलं...
'आता तरी जागा हो रे...' का कोण जाणे मला बजावलं...?
फक्त चारचं दिवसात पटलं मला... तुझं आईपण जाणवलं...
तू नसताना घरी... जेव्हा पप्पांना आई होता नाही आलं...
आता मला तुझं माझ्यामागचं लग्नाचं रडगाणं कळलं...
त्या मागचा तो भयाण सूर आठवून एका अनाहूत चिंतेने मन हेलावलं...
तू प्रत्येकवेळी जवळ असताना मला कधीच नाही गं हे समजलं...
आज हतबल होऊन पाहिलं तुला आणि अस्तित्व तुझं उमजल..!
                                                                                    ........महेंद्र :-X