POETS OF THE FALL - CARNIVAL OF RUST मराठीत!!

Started by Rohit Dhage, December 09, 2011, 12:42:20 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

तुझ्या गरजेच्या समयी तुझा जीव वाचवनाऱ्याचं तू नाव घेशील का
आणि मानहानी चाखून बघशील का जर ती तुला लालचीपनाची आठवण करून देणार असेल तर
आक्षेपाचे, गुंतागुंतीचे बाण येत राहतील जोपर्यंत तू खोटं बोलणार नाहीस
आणि ह्या सगळ्या गोंधळात गळ्यातला scarf आणि चमचमणारे धागे जवळ येतील तुला मारायला त्याअगोदर

ये ह्या पावसाला काही खायला घाल
कारण मी तुझ्या प्रेमाचा तहानलेला आहे आणि ह्या वासनेच्या आस्मानाखाली नाचतोय
खरंच खायला घाल ह्या पावसाला
कारण तुझ्या प्रेमाशिवाय माझं जगणं हे दुसरं काही नसून मरणांतिक उत्सव आहे

हा फक्त एक खेळ आहे, नामुष्की लपवण्याचा, जेव्हा खरे रंग रक्तबंबाळ होतात
हे सगळं त्या चुकीच्या वागवनुकीच्या नावाखाली खपवलं जातं ज्या गोष्टींची गरजही नाहीये
मी वासनिक झालेलो आहे आणि आता कसलाही दुष्काळ आपल्याला स्पर्श करू शकत नाही
आणि त्याहूनही जास्त, मी अशी आशा करतो की कधीही पडणार नाही जिथे पुष्कळही आधीसारखं पुरेसं नसेल

ये ह्या पावसाला काही खायला घाल
कारण मी तुझ्या प्रेमाचा तहानलेला आहे आणि ह्या वासनेच्या आस्मानाखाली नाचतोय
खरंच खायला घाल ह्या पावसाला
कारण तुझ्या प्रेमाशिवाय माझं जगणं हे दुसरं काही नसून मरणांतिक उत्सव आहे

निघून जाऊ नकोस..निघून जाऊ नकोस..जेव्हा माझं जग जळतंय तेव्हातरी
निघून जाऊ नकोस..निघून जाऊ नकोस..जेव्हा माझं हृदय किंकाळतंय तेव्हातरी
निघून जाऊ नकोस..निघून जाऊ नकोस..जेव्हा माझं जग जळतंय तेव्हातरी
निघून जाऊ नकोस..निघून जाऊ नकोस..जेव्हा माझं हृदय किंकाळतंय तेव्हातरी

- रोहित... ऐका आणि मगच बोला :)