नाते तुझे माझे

Started by Rupesh Naik, December 09, 2011, 09:04:18 PM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

नाते तुझे माझे
           रुपेश नाईक

भेट मनाची या मनाला
श्वास श्वासास मिळाला
स्पंदनांचे गीत व्हावे
दवाने  दवास भिजवावे 

राहिले ते ऋण होते
मिटले  ते समर्पण
अस्मितेच्या स्वत्वाचे
जसे दर्शनार्थी  दर्पण

सावलीही साथ सोडे
अन ते हि तीमिरांती
मात्र समांतर असे  तू
या जन्मी  अन मरणांती

मायेच्या नात्यात
गुरफटलेली सर्व नाती
ना--ते असे हे नाते
उलगडुनी साऱ्या गाठी...

Sanju mhetre

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दूखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी"अश्रूंची"गरज भासलीच नसती.
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत कधी उरलीच नसती..

Sanju mhetre

तो एक क्षण....
तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबरच्या प्रत्येक सोबतींचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.
... तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा .
तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.
तो एक क्षण तुझी प्रत्येक वेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.
तो एक क्षण तुझ्या प्रेमात अखंड बुडाल्यावर होत असलेल्या धाकधुकीचा.
तो एक क्षण अश्या प्रत्येक क्षणांची आठवण रोज होऊ देणाऱ्यांचा.
तो एक क्षण तो एक क्षण........!!!!                 Asa ka???????????

Sanju mhetre

एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी..,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी
........."प्रेम" करण्यासाठी.,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी...!!
... ...
... ... माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण,
माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही,                 Asa ka?????????????

Sanju mhetre

तुझ्याशिवाय जगणं बहुतेक....मला आता जमायचं नाही,
नाहीस तू ज्या स्वप्नांत....अश्या स्वप्नांत मला रमायचं नाही...

नसलीस तू तर माझ्या अंगणातली तुळस काही डुलायची नाही,
रागावेल ती रातराणी....मग तीही काही फुलायची नाही...
... ...
अडकलोय मी तुझ्या गाठीत...माझ्याकडून ती काही सुटायची नाही..
तू सोडून जगात असतीलही बाकी सुखं....पण मला ती काही लुटायची नाही...

सवय झालीय तुझी...आता मला एकटेपणाशी लढायचं नाही....
वेड आहेस तू माझं...मला त्या वेडातून बाहेर आता पडायचं नाही...

समजावू नकोस उगाच...मला ते काही पटायचं नाही....
तुझ्यासाठीच तुझ्याशी....मला काही आता झटायचं नाही....

नसशील तू साथ तर...विजयाचे डंक मला फुकायचे नाही...
तू चाल आता सोबत माझ्या....आपल्याला आता रुकायचे नाही....

पर्याय असतीलही खूप सारे.....पण पर्यायात मला जगायचं नाही...
पाहिले तर तुझेच नाही तर इतर डोळ्यांचं सौंदर्य मला बघायचं नाही.

नसतील तुला भिजवणार सरी...तर मला काही त्या पावसात भिजायचं नाही...
असाच जळू दे हा दिवा....मला काही आता विझायचं नाही...
जागाच राहू दे पाहत तुला....मला काही आता निजायचं नाही.            Asa ka?????????

rasna

Khup chan.............kaviata ahe
Natya madhal prem-apulaki jas tula kalal hope tas sarvana kalu de.......

prajakta gaikwad

तुझ्याशिवाय जगणं बहुतेक....मला आता जमायचं नाही,
नाहीस तू ज्या स्वप्नांत....अश्या स्वप्नांत मला रमायचं नाही...

नसलीस तू तर माझ्या अंगणातली तुळस काही डुलायची नाही,
रागावेल ती रातराणी....मग तीही काही फुलायची नाही...
... ...
अडकलोय मी तुझ्या गाठीत...माझ्याकडून ती काही सुटायची नाही..
तू सोडून जगात असतीलही बाकी सुखं....पण मला ती काही लुटायची नाही...

सवय झालीय तुझी...आता मला एकटेपणाशी लढायचं नाही....
वेड आहेस तू माझं...मला त्या वेडातून बाहेर आता पडायचं नाही...

समजावू नकोस उगाच...मला ते काही पटायचं नाही....
तुझ्यासाठीच तुझ्याशी....मला काही आता झटायचं नाही....

नसशील तू साथ तर...विजयाचे डंक मला फुकायचे नाही...
तू चाल आता सोबत माझ्या....आपल्याला आता रुकायचे नाही....

पर्याय असतीलही खूप सारे.....पण पर्यायात मला जगायचं नाही...
पाहिले तर तुझेच नाही तर इतर डोळ्यांचं सौंदर्य मला बघायचं नाही.

नसतील तुला भिजवणार सरी...तर मला काही त्या पावसात भिजायचं नाही...
असाच जळू दे हा दिवा....मला काही आता विझायचं नाही...
जागाच राहू दे पाहत तुला....मला काही आता निजायचं नाही.            Asa ka?????????

vinit sontakke