---- आठवनीच्या कातरवेळी ----

Started by सूर्य, December 10, 2011, 02:24:26 AM

Previous topic - Next topic

सूर्य

नाही म्हणतो तरी ती येते
आठवनीच्या कातरवेळी...

विचार नुसता फिरत रहातो
भास् उगिचा करू पहातो
कुणास ठावुक किती अजुनमी
मनास माझ्या वाचत जातो ..
नाही म्हणतो तरी ती येते
आठवनीच्या कातरवेळी...

पावुल पावुल तिचे नाचती
आवाजातून फुले ही गाती
वेळ मधुर अन नुसते ठोके
कालिज चिरुण तुजला देती ..
नाही म्हणतो तरी ती येते
आठवनीच्या कातरवेळी...

ढगामधुन ती झिरपत येते
नाद विजेचा करुण घेते
काही ठिपके जमिनिवरती 
काही हळव्या हृदयाला देते  ..
नाही म्हणतो तरी ती येते
आठवनीच्या कातरवेळी...

ज्ञानदीप सागर ....