मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं..!!

Started by Rohit Dhage, December 10, 2011, 06:02:24 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

मन मोकळं, अगदी मोकळं  करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं  आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण  आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर  पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं,  अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात  काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या  उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने  चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी  बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो  आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून  ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं  आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन  पाखराशी बोलायचं.

- Sushant

रणदीप खोटे

छान आहे बरी आहे ठीक आहे पण त्या कोथरूड गल्लीसम्राट कवी संदीप खरेपेक्षा निश्चितच उजवी आहे.

raghav.shastri

छान आहे...
प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं...

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं...



sonalipanchal

छान आहे...
प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं...

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं...



Pravin5000


sindu.sonwane

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं  आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन  पाखराशी बोलायचं.
Khup Chan