असाच एक विचार..

Started by Rohit Dhage, December 12, 2011, 01:48:45 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

कधी कधी वाटतं
जे गहन अर्थ.. जे गूढ.. न उकललेलंच ठीक असतं
ते उलगडून गेलंय.. चुकूनच
कळून चुकल्यासारखं वाटतंय
काही एक अर्थ नाहीये.. या जगण्याला
काय साध्य करणार.. कशाला जगणार.. एक दिवस मरण्यासाठी??
काय करणार जगून.. चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवणार?
दोन मुले, घर, संसार, जबाबदाऱ्या, म्हातारपण हेच का आयुष्य?
हेच असेल तर ते जगलेत.. किती तरी जगतात.. आपण ही जगलोय..रोज यातलं एक तरी पात्र
आणि बाकीची पण जगणार.. उरलेली जगून पूर्ण करणार.. कशासाठी?
एक दिवस मरण्यासाठी??
मोक्ष म्हणे असतो काहीतरी एक प्रकार
करतात साधू जीवाचं हिमालय
थंडीत मरतात.. देवासाठी झुरतात
काय सापडलाय का त्यांना?
की हा सुद्धा एक आडवाटेने जाणारा जगण्याचाच बहाणा
त्यांनाच ठाऊक.. आपली चोरी स्वतःलाच ठाऊक
पण बघावं जाऊन त्यांच्या देशा
आपल्या परंपरा सांभाळूनच
बघून तरी यावं त्यांची गणितं.. असतीलच तर
नाहीतरी आपली तशी फसलेलीच..
जे डबीत असतं ते उघडेपर्यंत तरी सोनंच असतं..
उघडल्यानंतर काय तो निवडा
उघडायचे तर कष्ट घ्यावेच लागणार..
जोपर्यंत शांत होत नाही
तोपर्यंत डबे उघडत राहणार.. सापडतील तेवढे!!

- रोहित

santoshi.world

#1
i like this one ..


कधी कधी वाटतं जे गहन अर्थ.. जे गूढ.. न उकललेलंच ठीक असतं ते उलगडून गेलंय.. चुकूनच कळून चुकल्यासारखं वाटतंय काही एक अर्थ नाहीये.. या जगण्याला काय साध्य करणार.. कशाला जगणार.. एक दिवस मरण्यासाठी?? काय करणार जगून.. चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवणार? दोन मुले, घर, संसार, जबाबदाऱ्या, म्हातारपण हेच का आयुष्य? हेच असेल तर ते जगलेत.. किती तरी जगतात.. आपण ही जगलोय..रोज यातलं एक तरी पात्र आणि बाकीची पण जगणार.. उरलेली जगून पूर्ण करणार.. कशासाठी? एक दिवस मरण्यासाठी??

Rohit Dhage


Ghost


केदार मेहेंदळे

जोपर्यंत शांत होत नाही
तोपर्यंत डबे उघडत राहणार.. सापडतील तेवढे!!


exilent...