गझल

Started by kaivalypethkar, December 17, 2011, 01:23:45 PM

Previous topic - Next topic

kaivalypethkar

आता मला ह्या इथे बस तके करावे वाटते
थोडे हसावे वाटते थोडे रडावे वाटते.

आज माझ्या तपतयेने जिंकेल हे जग जरी
मेनकेने
जिंकलेला संत व्हावे वाटते.

वळवाच्या पावसाची  का तुला इतकी नशा
मजला जाळावे वाटते तुजला भिजावे वाटते.

जाहलो मी दूर तुझिया सावलीशी वैर माझे
  का तुला स्वप्नात माझ्या मी नसावे वाटते.

ऐकली आवर्तने तू खंडल्या माझ्या तर्हांची
आज मजला तटिनी परी अनंत व्हावे वाटते.

माझियाच मैफिलीत माझी केलीस तू थट्टा अशी
उसासे अन आसवांनाया म्हणावे वाटते.