मैत्री प्रेम

Started by Neha mhatre, December 17, 2011, 09:27:11 PM

Previous topic - Next topic

Neha mhatre

मैत्रीचे नाते किती अनमोल असते,
हे त्यादिवशी त्याला कळले जेव्हा ती त्याच्यासोबत मैत्री तोडते...
मैत्री होती दोघांची पण प्रेमी सारखे भांडायचे,
नको त्या गोष्टीला धरून बसायचे...
रोजच्या भांडणाला कंटाळून मैत्री तिने तोडली,
तिच्या या निर्णयाने इथली दिशाच पलटली...
स्वतःला त्यानी बदलले तिच्यासाठी,
कारण त्याला हवी होती तिची मैत्री कायमसाठी...
खूप प्रयत्न केले त्याने तिला समजवण्याचे, नाही आता आपले कधी भांडण व्हायचे...
जिथे ती नाही तिथे त्याला नाही रमायचे,
ती असली तर मन फुलून जायायचे...
तिच्या सोबत बोलायला त्याला दिवस कमी पडायचा,
फोन करून थकला तरी msgचा तर वर्षाव करायचा...
मैत्री होती ती का?
दुसर कोणत नात,
नाही सापडल उत्तर म्हणून आज तुमच्यासमोर सगळ मांडल...

नेहा म्हात्रे.


justsahil

Nice lines..... आणि...खर आहे.....मैत्री अशी असू शकते......पण भांडण होऊन तुटू शकत नाही.....

केदार मेहेंदळे



Ravi Padekar