समाज'कारण'

Started by Rohit Dhage, December 20, 2011, 12:50:15 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

वये इथली वाढत चाललीत
दिवस राहिले जळत चाललेत
कोवळेपणा पोळून गेलाय
चेहरे इथले निष्ठुर झालेत

माणुसकीची काय बात करता
माणूस इथले श्वान होत चाललेत
त्यांचीही त्यात चूक नाही म्हणा
आधीची कर्मे हे घडवत चाललीत

नकळत्या वयात ऐकून होतो
अज्ञानातच सुख असतं असं काही
ही दुनिया जेवढी पाहत चाललोय
ह्या नसत्या ज्ञानात मी वाहत चाललोय

दिवस इथले काळोख झालेत
कोवळे चेहरे राख झालेत
हा कोवळाच एक उद्याचा श्वान असेल
आणि त्याला नाव ठेवायला हा कारणी समाज असेल

- रोहित

Umesh Tambe

मला फार आवडली...........मित्रा................... ::)

केदार मेहेंदळे

हा कोवळाच एक उद्याचा श्वान असेल
आणि त्याला नाव ठेवायला हा कारणी समाज असेल


satya vachan