देवाचे आभार

Started by kalpana shinde, December 21, 2011, 04:21:59 PM

Previous topic - Next topic

kalpana shinde

काल देव मला स्वप्नात भेटला
माग हवे ते मला म्हणाला
मी बोलली नको काही मला
दिलेस तेच खूप आहे
दुक्खांची जखम अजून ओली आहे

जे हवे ते नाही दिलेस
नको ते पदरात टाकलेस
सुख एक तर दुक्ख १०० दिलेस
तरीही जगते आहे कारण हे
जीवन पण तूच मला दिलेस,

असंख्य लोक आहेत जगात
मीच का रे दिसते तुला पाण्यात
  नशिबाशी खेळताना माझ्या
विचार नाही आला का तुझ्या मनात 


देव म्हणाला असे नही बाळा
समजून तरी घे मला

मी तुला सुख पण दिले
पण तूला  नाही ते दिसले
नको त्याच्या  मागे धावली
होते तेही गमावून बसली
 

जे तूला हवे होते
ते तुझे कधी नव्हते
अवर घाल स्वतःच्या मनाला
मान्य कर आहे त्या परिस्थितीला

कसे अवर घालू माझ्या मनाला
आठवणी  त्याच्या सतावतात मला
अजूनही मनाला आस आहे
त्याचा येण्याचा ध्यास आहे

अरे देवा आता तरी थांबव
हा सावल्यांचा खेळ
करून दे पुन्हा
आमचा मेळ

जे हाताच्या रेषेत नाही
ते मी तुला देऊ शकत नाही
तुज आहे तुझ पाशी
नको घेऊ झेप आकाशी

हे जग खूप सुंदर आहे
एकदा तू जागून बघ
खूप मागितलेस दुसर्यांसाठी
स्वतहासाठी पण थोडे मागून  बघ

आभार मानले देवाचे
सोडले दार दुखाचे
कवटाळले क्षण सुखाचे  :( :( :(


(कल्पना शिंदे(mona) -२०.१२.2011)


केदार मेहेंदळे



Mangesh Bharat