मधुचंद्राची रात्र

Started by amoul, December 24, 2011, 11:22:24 AM

Previous topic - Next topic

amoul

हे  क्षण  नाजूक  हेच  क्षण  अनमोल,
इथेच  जपायचा  नेमका  तू  आणि  मी  समतोल.

इथेच  नाही  राहायचे,  यातच  नाही  वहायचे,
हा  नाही  मुक्काम  आपला  इथून  पुढे  जायचे.
संसाराच्या  लक्ष्यांवरलं  हा  विश्रांतीचा  पढाव  आहे,
इथून  फार  लांब  गाठायचे  गाव  आहे.
पण  इथेच  एकमेकांना  जाणायचे  सखोल.

इथे  उलगडायची  एकमेकांची  मनं,
नाजुकश्या  या  वळणावर  विसरायचे  नाभान.
आदर  असू  द्यावा  एकमेकांच्या  भावनेचा,
संसारात  शिरतांना  या  संसारी  कामनेचा.
स्पर्श  होतात बोलके  ओठ  जरी  अबोल.

इथेच  ठरवायच्या  एकमेकांच्या  मर्यादा,
आणि  शपथ  घ्यायची  ती  जपण्याची  सदा.
हे  पवित्र  मिलन  जरी बंद  अंधारात,
संसार  खुलावा  विश्वासाच्या  प्रकाशात.
अति प्रसंगातही टिकावी  हि  नात्याची  ओल.

एकमेकांचा  एकमेकांवर  जरी  आहे अधिकार,
तरी  स्वातंत्र्य  असावे  दर्शविण्या  नकार.
ओढतानाने  होऊ  नये  हा  समागम,
निखळ  आनंदात  पार  पडावा  हा  शरीराचा  संगम.
हि  रात्र  मनात  रुजावी  खोलखोल.

................अमोल

santoshi.world

केदार मेहेंदळे

Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in