पत्र ...

Started by utkarsh, December 24, 2011, 07:48:39 PM

Previous topic - Next topic

utkarsh

तुला त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं होत ,
तू तुझ्या आई सोबत निघाली होतीस, चेहेऱ्यावरून  समजत होत कि तू नक्कीच चिडली होतीस
किती छान दिसत होतीस ......कितक्यात निघून पण गेलीस ..
मला वाटल झाल आता परत कधीच दिसणार नाहीस
हव तर चमत्कार म्हण पण जवळपास सहा महिन्यानंतर तू माझ्याच कॉलेज मध्ये अडमिशन घेतलेलेस
मी खूप सुखावलो होतो त्या दिवशी वाटल आता सार काही माझ्या मनासारख होईल
मग काय सुरु झाली रोजची कहाणी, आता रोजच तुझा पाठलाग करू लागलो
तू खूप चिडू लागलीस तरीही एक दिवस धाडस करून तुला विचारलेच
तुझा नकार मला खूप बदलून गेला ठरवलं कि तुला विसरायचं काहीही करून ....
पण म्हणतात ना...
when you love,you get hurt,
when you get hurt,you hate,
when you hate,you try to forget,
when you try to forget,you start missing,
when you start missing,you fall in love again.
आणि तुला विसरायचं सोडाच पण आता तर अश्या ठिकाणी येऊन पोहोचलोय जेथून तुझा नकार ,तिरस्कार
माझ्यासाठी काहीच महत्त्वाचा नाहीये , मला फक्त एवढंच  माहितेय  कि मी तुझ्यावर इतक प्रेम करतो
जितक कोणी केले नसेल ...
खूप वर्षे  झालेत तुला भेटून पण आजही तुझी तशीच छबी आहे माझ्या मनात ...
तुला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी पण तू चिडली होतीस  आणि तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तरी तू
खूप चिडायची पण खर सांगू तू चिडल्यावर खूप छान दिसतेस ....
मध्यंतरी खूप गोष्टी घडल्या ज्या मला सांगायच्या नाहीत ...
मला सगळे म्हणू लागलेत कि सारख तिचंच नाव का घेतोस ?,एकांतात ही कोणाशी बोलत असतोस ?
पण त्यांना काय माहित कि माझ्यासाठी "जग " या दोन शब्दांचा अर्थ तू आहेस आणि तूच माझ सर्वस्व  आहेस ..
वेडे आहेत ग सगळे...आणि बोलतात मला वेड लागलंय ...
मी वेडा नाहीये ..
दिवसातून ५ पत्र म्हणजे जास्त होतात का गं ?
आता तर इथले लोक मला लिहायला कागद पेन पण देत नाहीयेत
आणि किती लिहू मी तुला .....तुझा पत्ता दे ना पाठवून ....
आणि हो माझा पण पत्ता बदलला आहे
मला कुठेतरी  वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये ठेवलंय
इथला पत्ता समजला कि तुला लगेच कळवतो ....   
                                                  तुझाच ..
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
{GHOST 2.1}


baji


utkarsh


jyoti salunkhe

Very Nice And Very Santi...............I Really Like It :)

utkarsh