Social Networking वरील निर्बंध...सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार...

Started by amitunde, December 25, 2011, 06:02:39 PM

Previous topic - Next topic

amitunde

सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार....

इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी. असा मजकूर प्रसिद्ध होणार नाही हे पाहणे त्यांचे काम आहे,' अशा शब्दांत सरकारने या दोन संकेतस्थळांना तंबी दिली आहे.

सरकारला जर वाटत असेल असे काही मजकूर , फोटो झळकू नये तर सरकारने आपली प्रतिमा साफ ठेवावी. सरकारची ही कृती म्हणजे सामान्यांच्या आपले विचार व्यक्त करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यासारखेच आहे. देशाच्या विरुद्ध काही कुणी बोलले तर चालते मात्र गांधी घराण्याच्या विरुद्ध खरे बोलण्याचे धाडस केले कि यांची जळते...? ह्याचा अर्थ सरळ आहे. कॉंग्रेस ला देशापेक्षा त्यांचे गांधी घराणे जास्त प्रिया आहे.

सरकार करत असलेल्या अन्यायाना प्रसिद्धी देऊ नका, त्यांनी केलेले अन्याय सुद्धा न्यायच आहे असे छापा, लोकशाहीत जनतेची गळचेपी, लूट, फसवणूक केली जात असेल तर ते सुद्धा सरकारच्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे छापा, अतिरेक्याना फासावर चढवले जात नसेल तर ते मानवतेच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे असे समजा, किंमती वाढल्या म्हणजे महागाई वाढली असे समजू नका, गुन्हेगार राजकारणात आले म्हणजे ते सन्मार्गाला लागले असे समजा असाच संदेश यातून सरकारला द्यायचा आहे.

आमच्या शेतकऱ्यांवर जेव्हा आपण गोळीबार करता ......भारतीय जनतेचे करोडो रुपये लुटता .....येथील आई बहिण्नींवर अत्याचार करता.....येथे भर दिवसा चोऱ्या करता.....आमचे शेतकरी आत्महत्या करतात .....आण्णा हजारे ,किरण बेदी ह्यांच्या सारख्या समाजसेवी माणसांवर जेव्हा दिग्विजय आणि कपिलसारखे सारखे नालायक नेते आरोप करतात....त्यावेळी सरकारला जग येत नाही.......

आपल्या संयमाचा चुकीचा अर्थ लावला जातोय...आपल्या अभिव्यक्ती आणि वैचारिक स्वातंत्र्याची कत्तल केली जात आहे..ते दुर्लीक्षले जात आहे...भावनांना बोलता आले असते तर त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या असत्या....आपल्या भावनांना वेदना आहीत फक्त अश्रू आहेत...क्रोधाला अंगार नाही फक्त क्षमाशीलता आहे...सरकारने अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे यात काही विशेष मानलंच जात नाही...तो सृष्टीनियमच समाजाला जातोय...

अधिक विलंब आता हानिकारक होईल असे मला वाटते...देशाच्या इतिहासाचे पण जर आज बदलले नाही तर बाकी पाने कोरीच राहतील...कधीतरी आण्नासारखे झंझावाती वादळ येईल आणि हे सर्व दूर करेल या भ्रमात राहु नका...धाडस कुणीतरी करायला हव आणि कुणीतरी करायला हव म्हणून सगळेच वाट बघत बसले तर हे कदापि होणार नाही...व्यक्ती हि देशापेक्षा कधीच मोठी नसते हा संदेश आपल्याला द्यायलाच हवा....

देश आपला आहे आणि तो आपल्यालाच सांभाळायचा आहे....

जय हिंद.......