धर्मनिरपेक्ष भारत आणि देशात हायअलर्ट............

Started by amitunde, December 25, 2011, 06:04:12 PM

Previous topic - Next topic

amitunde

धर्मनिरपेक्ष भारत आणि देशात हायअलर्ट............

देशभर खळबळ उडवून दिल्यानंतर दोन समाजातील असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या बाबरी मशिदीच्या पतनाला १९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अयोध्या आणि फैजाबादसह संपूर्ण देशात अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . रामजन्मभूमीचे ठिकाण असलेल्या अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये संपूर्ण देश होरपळून निघाला होता. त्याच्या कट...ू स्मृती आजही हजारोंच्या मनात घर करून आहेत. दोन समाजात कायमचे वैर निर्माण केलेल्या या घटनेने देशाचे स्वरूपच बदलून टाकले होते.

मित्रानो, जे घडले होते, ते चूक कि बरोबर याचा विचार करण्याची हि वेळ नव्हे. महागाई, भ्रष्टाचार, आत्महत्या, दहशतवाद, प्रांतिक आणि भाषीय वाद अशा कितीतरी संकटांनी आज उग्ररूप धारण केलय. धर्माचा अभिमान जरूर बाळगावा पण गर्व नसावा. दुसर्या धर्माबद्दल आदर दाखवावा. GEETA, KURAN आणि BIBLE हे सर्व ग्रंथ पाच शब्दांचेच असून सर्वच मानवता आणि सहिष्णुतेचा संदेश देतात. मग आपण का त्याचे पालन करू शकत नाही. सामाजिक बांधिलकीला महत्त्व दिलंच पाहिजे.

आपल्या समाजाची दरी वाढली आहे. हिंदूनी मुस्लिमांकडे बोट दाखवयाचं, मुस्लिमांनी हिंदूकडे बोट दाखवायचं. ह्या पार्टीने त्या पार्टीला नावं ठेवायची अशाने देशाची प्रगती होणार नाही. आणि याचा फायदा बाहेरचे लोक घेत आहेत.इंग्रजांनी याच जातीय असलोख्याचा फायदा घेऊन १५० वर्षे राज्य केले होते. फाळणीनंतर झालेला रक्तरंजित संघर्षही आपल्याला माहित आहे. असे असूनही तीच चूक आपण पुन्हा करतोय. राजकारण करणार्यानाही याचा नेहमीच फायदा उठवलाय. हे सर्वज्ञात असूनही आपण बदलत का नाही...???

आधुनिकतेची कास धरताना अजून किती दिवस भावनिक आणि धार्मिक गोष्टीना महत्त्व द्यायचे. धर्मनिरपेक्ष भारत आणि विविधतेत एकता हीच भारताची खरी ओळख आणि शक्तीस्थळे आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर प्रगल्भ झालेल्या भारतीय समाजाने शांततेचे अभूतपूर्व दर्शन जगाला घडवून दिले होते. पण लगेच आपण परत पहिल्याच मार्गावरून का प्रवास करतो...हिंदू आणि मुसलमान हा मनाने कधी एक होणार....कधीतरी आपण थांबले पाहीजे. ...किती काळ असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहणार.....कधी विचार करणार....पुस्तकात जे लिहिलंय ते प्रत्यक्षात अमलात आणा...आणि खऱ्या अर्थाने स्वताला सुजान भारतीय नागरिक म्हणा....

हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई;
सगळे ओरडले-"आम्ही भाई-भाई.....

मग का करता
एकमेकांचा जीव घेण्याची घाई घाई ...

वेळीच सुधारा
नाहीतर सर्वांचीच अवस्था अत्यंत वाईट होई होई ....


सगळं अनुत्तरीत आहे. म्हणून बाहेर काढायचं धाडस होत नव्हतं. आज आलं बाहेर. कोणाला यातून दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण हे जग जितकं आपलं आहे तितकेच आपल्या पुढच्या पिढीचेही आहे. थोडी शक्ती हे सारे सुंदर बनवायला खर्च करू. विचार करा .

अमित सतीश उंडे........

santoshi.world