हुंडापद्धत,स्त्री अत्याचार आणि पुरुषप्रधान संस्कृती......

Started by amitunde, December 26, 2011, 11:47:12 AM

Previous topic - Next topic

amitunde

उतू नका....मातु नका
वैचारिक मूल्यांचे धिंडवडे काढू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

बायकोला दासी समजू नका
भावनांची तिच्या कत्तल करू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

प्रेम दिल्याने प्रेम वाढते हे कधी विसरू नका
सासरच्या लोकांना ATM मशीन समजू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

बायकोचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका
स्वताचे विचार लादून तिच्यावर अत्याचार करू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

वासनेच्या आहारी जाऊन तिला कसेही ओरबाडू नका
संस्कृतीच्या नावाखाली हक्क तिच्यावर गाजवू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

व्यसनासाठी स्वताच्या दागिने तिचे विकू नका
पैशासाठी कधी तिला मारहाण देखील करू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

आपल्या चुकीची शिक्षा तिला कधी देवू नका
स्वताची अकार्यक्षमता तिच्या पदराआड लपवू नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

पाश्चात्यांचे अनुकरण करताना स्वताची सभ्यता विसरू नका
चुकीचे वागून स्वताच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.....

स्वताबरोबर देशाचा विकास आणि प्रगती करूया
स्त्री हि शक्ती आहे तिचा मान आपण राखूया
विचार चांगले करून एकमेकांचे जीवन फुलवूया
मित्रानो,तुम्ही तरी हुंडा मागू नका.......

भारतीय समाज शतकानुशतके काही अनिष्ट रूढी-परंपरात अडकला आहे...स्वताला सुशिक्षित समजणाऱ्या भारतीय समाजाची मानसिकता आजही बदलली नाही ...पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली अजूनही स्त्रियांवर अत्याचार चाले आहेत...हे सर्व बदलायला आपल्यापासूनच सुरुवात करूया.....

अमित उंडे ........

santoshi.world