आम्ही कोण काय पुसता

Started by केदार मेहेंदळे, December 26, 2011, 01:04:14 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

(हल्ली भटक्या कुत्र्यांचा उपद्रव फारच वाढला आहे. परवाच पेपर मध्ये ह्या बाबत एक लेख वाचला. त्यावरून सुचलेली कविता.)
  आम्ही कोण काय पुसता
आम्ही कुत्रे रस्त्यावरचे
शहरात मुर्दाड माणसांच्या
राज्य आमचे दहशतीचे

रस्त्यात मधोमध आम्ही बसतो
गाड्यान मागे आम्ही धावतो
चालणार्यांची नडगी फोडतो
रस्त्या रस्त्यात दहशत पसरवतो

एखाद दिवशी  मज्जा करतो
एकट्या दुकट्याचे लचके तोडतो
पेपरात बातमी छापून आणतो
दहशत आमची अजूनच पसरवतो

चार दिवस सगळे ओरडतात
पुन्हा सगळ विसरून जातात
आमच्या पासून लांब पळतात
मूर्ख कैवारी आम्हाला कुरवाळतात

आम्ही कोण काय पुसता
आम्ही कुत्रे रस्त्यावरचे
शहरात मूर्ख  माणसांच्या
राज्य आमचे बेमुर्व्वतांचे

आम्ही बसतो रस्त्यांवर
आम्ही बसतो जिन्यांवर
आम्ही मुततो गाड्यांवर
आम्ही ह्गतो स्टेशनावर 

होतो कधी माणसाच्या सेवेला
फेकलेल्या तुकड्यांवर जगायला
ठेवलाय आता त्यांनाच नोकरीला
आमची घाण साफ करायला

तरी मूर्खांना अक्कल नाही
कैवार्यांचा आम्हाला तोटा नाही
खाण्याची आम्हाला ददात नाही
बिस्कीट, दुधाला तोटा नाही

आम्ही कोण काय पुसता
आम्ही कुत्रे रस्त्यावरचे
शहरात नेभळट  माणसांच्या
राज्य आमचे बेदारकारांचे

भर रस्त्यात ग्यांगवॉंर करतो
बाहेरच्या कुत्र्यांना  पळवून लावतो
कुत्रीवर सरळ ग्यांगरेप करतो
रात्रभर भुंकून हैदोस घालतो

विधिनिषेध आम्हाला नाही कसला
रस्त्यावर सेक्सची लुटतो मज्जा
पिलही आम्हाला उदंड होतात
आमची ग्यांग अजून वाढवतात

सरकार दरबारी आमचीच चलती
आम्हाला ठार मारायची आहे बंदी
बेअसर आहे आम्हावर नसबंदी
पॉंप्यूलेशनची आमच्या नाही गिनती

आम्ही कोण काय पुसता
आम्ही कुत्रे रस्त्यावरचे
शहरात मुर्दाड माणसांच्या
राज्य आमचे दहशतीचे

केदार....

तुझी आठवण....!

कवीता प्रत्येक point ला धरुन आहे पण तुम्ही कुत्र्यांना असे तुच्छ लेखु नका

केदार मेहेंदळे

thanks.... mi kutranna nahi tar bhtkya kutryanche fajil lad krnaryanwar vaitaglo aahe.