प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे....

Started by 8087060021, December 27, 2011, 11:49:18 AM

Previous topic - Next topic

8087060021

प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे....

जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम
होते
पण अपयशाच्या भितीने ते मानातच
राहते
पुढचा विचार सोडून मनातले बोलुन
टाकावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
प्रेमाचा अनुभव हा काही वेगळाच असतो
खऱ्या प्रेमामद्धे काही एक नियम नसतो
प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे


--Author Unknown