रुप तुझे

Started by 8087060021, December 28, 2011, 11:52:11 AM

Previous topic - Next topic

8087060021

रुप तुझे


रुप तुझे वर्णाया अक्षरे माझी तोकडी पडावी ,
एक स्मितहास्य तुझे बस्स, एक गझल बनावी

आसमंत गंधाळावा, सुगंधीत श्वासांनी तुझ्या,
छटा आसमंताची त्या, माझ्या मिठीत मिळावी

मादकता तुझ्या स्पर्शात, नजरेत असे नशा,
फक्तच कल्पनेने तुझ्या, काळीजं घायाळावी

असूया तुझ्या सौंदर्याची ग्रह, तारे, नक्षत्रांनाही,
अंश तुझा मिळावा, आसक्ती त्यांनाही असावी,

विसावता मिठीत माझ्या गौरवर्ण मुर्त तुझी,
अमुर्त ती प्रीत माझी आपसुकच विरघळावी...

-- Author Unknown

MK ADMIN

#1
Krupaya kavita post kartana mul kavi che naav taka...nav mahit nasel tar "Author Unknown" taka..anyatha kavita post karu naye... sadhya me post edit karto ahe..next time kalgi ghya..MK che niyam pala...this is the last warning to you.