बहरलेला गुलमोहर ......

Started by महेश मनोहर कोरे, December 30, 2011, 11:12:14 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

मला न कळले तुला न उमगले
प्रीतीचे पाऊल नेहमीचे जुळले

पाहता जीवनाची दारे.....
उघडली माझ्यासाठी
सदासर्वकाळ मोहरल्या..... 
आपल्या प्रेमाच्या रेशीमगाठी

त्या गाठीतून मग हास्य उमटले
प्रीतीचे पाऊल नेहमीचे जुळले

दोघांच्या सहवासातून...
बहरला सुगंधी मोगरा
घेतात काळजी जणू....
जीव लाविती पाखरा 

त्या पंखातून मग बळ प्रकटले
प्रीतीचे पाऊल नेहमीचे जुळले

शांत तळ्यात रमते जसे 
एक राजहंसी जोडपे....
रखरखत्या जीवनात आपण
टपोऱ्या थेबांची आसवे.....

तळ्यातील तरंगसुद्धा मग शहारले 
प्रीतीचे पाऊल नेहमीचे जुळले

मला न कळले तुला न उमगले
प्रीतीचे पाऊल सहजच जुळले

                                   ...... महेश मनोहर कोरे
                                               पुणे