दिव्य प्रीती

Started by sulabhasabnis@gmail.com, December 31, 2011, 10:00:35 AM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

     दिव्य प्रीती 
गिरीशिखरावर विसावलेल्या सजल सावळ्या घना
गूज सांगशी काय मनीचे जांभळ्या सख्याच्या काना
चंचलचपला विद्युतबाला आली तुझिया मना
रूपचिंतनी विसरून गेला काय जला बरसण्या?
देईल का प्रतिसाद प्रीतिला तेजस गौरांगना?
शंकित होउन काय बैसला ऐसा उदासवाणा
जीवन सारे उधळुन देसी तोषविण्यासी जना
प्रीती उधळित तळपुन जाईल का नच दिव्यांगना?
दिव्य प्रीतिचे गमक ऐक बा वृथा करी खंत ना
हेच सांगुनी सखा काय तो करी तुझी सांत्वना       
               ---------------------

MK ADMIN

krupaya title suddha marathi madhye post karave...
me edit kela ahe ya veli...next time krupaya kalji ghya...

Enjoy MK  :)

केदार मेहेंदळे



shardul

#4
utaam ahe...shabdha rachna avadhli

Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in