मंत्र्याचं कार्ट & गावातली चिमुरडी

Started by madhura, January 02, 2012, 10:02:11 AM

Previous topic - Next topic

madhura

मंत्र्याचं कार्ट,
लई त्याचे उपद्व्याप
मोठे मोठे व्याप
लाखाचे कपडे,
करोडोंचे लफडे,
... सरकारी बंगला,
पुढे मागे पोलीस,
जणू त्याचे ओलीस,
हवे तितके चाकर,
दिसेल त्याला वापर
लफडी करून आला,
त्याच्या स्वागताला
दहा जणं धावली......


गावातली चिमुरडी
फाटलेलं दप्तर,
तुटलेलं बक्कल
पायात नाही चप्पल
मळलेला स्कर्ट
उसवलेला शर्ट
आईबाप शेतात
वीज नाही घरात
अनवाणी चालत
शाळेतून आली
तिच्या स्वागताला
तुटलेली बाहुली........


आवडलं तर नक्की शेअर करा
-- शरद