प्रेमाचा त्रिकोण

Started by केदार मेहेंदळे, January 02, 2012, 01:56:48 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
चंद्र, पृथ्वी आणि सूर्याचा प्रेमाचा त्रिकोण.


बघतो दुरूनच तुला मी
रात्र रात्र मज झोप नाही
भोवती तुझ्या फिरताना
छंद दुसरा उरलाच नाही

माहित मज सखा सूर्य तुझा
फिरतेस तू त्याच्या भवती
जाळतो  तुजला नभातुनी तो
मी चंद्र प्रभेनी तुज भिजवी

पाठवितो तारका किती मी
सांगण्या माझी प्रीत तुजवरी
जाळूनी तू त्यांना परी
का ग मजला दूर करी?
*********************************************
फिरते  भवतीच तुझ्या तरी
का दूर बसलास तू नभी
का रे सख्या तू दूर असा
जाळतो  मजला विरह किती

तो चंद्र नभीचा भुलवतो बघ
मज शीतल प्रेम लहरींनी
आंस परी जळण्याची  मजला
मी तुझीच रे दिवाणी

संपेल कधी हा दुरावा
होईन कधी एकरूप
एकदाच मज घेऊन कवेत
जाळून टाक तव तेजात
*****************************************
आंस तुला संपण्याची जरी
मज आंस तुला बघण्याची
जळतो जरी विरहात तरी
मी बघतो तुला दुरुनी

घेता तुज जवळी एकदा
लक्षलक्ष या हातांनी 
जळून होशील भस्म त्वरित
दिसशील मज ना पुन्हा कधी

मजलाही आंस मिलनाची जरी
राहतो दूर तुज पासुनी
जळण्यास तू तयार तरी
मज आंस तुला बघण्याची



केदार.....


Gyani


santoshi.world

reallly superbbbbbbbbbbbb ............. apratim .........khup khup khup avadali hi kavita ........ keep writing n keep posting :)

shyboy

बरेच दिवस मी तुमच्या comments आणि  कविता वाचतो आहे.
सुरवातीला वाटले जे नवीन कवी आहेत त्यांना तुम्ही प्रोस्ताहन देता आहात. पण नंतर तुमचा खेळ लक्षात यायला लागला
जे कवी तुमच्या varchaad आहेत   त्यांचे तुम्ही कधी कौतुक करतच नाही. मला कविता शिकायची आहे हे बिरूद किती दिवस मिरवणार
स्वताचे पाय जमिनीवर आहेत हे दाखवायचे नाटक आहे का हे. बराच वेळा असे लक्षात आले आहे कि काही कवितांना तुम्ही विनाकारण कौतुक करता
चुकीच्या गोष्टींचे कौतुक करून मराठी कवितेवर अन्याय करता आहात.




Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in

sindu.sonwane

Khup khup chan kavita ahe...................................... i like very very much