अण्णा हजारे आगे बढो (अ )हम तुम्हारे साथ हैं

Started by sanjaymane 1113, January 02, 2012, 10:04:34 PM

Previous topic - Next topic

sanjaymane 1113



अण्णा हजारे आगे बढो (अ )हम तुम्हारे साथ हैं
                    अण्णा तुमच्या आंदोलनाला आमचा नुसता पाठीम्बाच नाही तर आमचा सक्रीय सहभाग आहे.आज  तुमच्या मुळे आम्हाला उपोषणाची ताकद कळली .आणखी एक गोष्ट तुमच्या उपोषणामुळे झाली ,कुपोषण ,गुंडगिरी ,प्रदूषणामुळे होणारा पृथ्वीचा र्र्हास ,मुलींचा घटता जन्मदर ,महागाई, असे सर्वच विषय आता फिके वाटू लागलेत.
                         तुमच ते लोकपाल कि काय ते बिल लवकर यायलाच हव . म्हणजे मीपण सगळ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना सळो कि पळो करून सोडेन .अहो हे पोलिसवाले इतके हैराण करतात आम्हाला,तो धोनी, जाहिरातीत एका मोटार सायकलवर आठ दहा मुलांना घेऊन फिरतो, पण आम्ही तीन सीट घेतल्या तर लगेच फाइन मारतात. एम एस इ बीच्या ऑफिस मध्ये सुद्धा अनेकदा विनंती केली कि आमचा मीटर स्लो करून द्या तरी ऐकत नाहीत. आमच्या घरी इस्त्री, गिझर ,टीवी, फ्रीज सर्व काही आहे. वीज बिल भरणे परवडत नाही हो. मागे आमच्या घराजवळ रस्त्याचे काम सुरु होते. मी त्या मजुरांना म्हटले ५०० रुपये देतो, एखादा ट्रक खडी बागेतल्या रस्त्या साठी टाका, तर त्यांनी सरळ सरळ नकार दिला. अण्णा तुमच लोकपाल बिल आल कि या सगळ्यांना धडा शिकवेन, मी आमच्या गावातला अण्णा हजारे म्हणून फेमस झालो कि हे सगळे जण आपोआप सहकार्य करायला लागतील.
अण्णा, तुमच्यावर टीका करणारे म्हणतात कि अहंम तुम्हारे साथ हैं. पण तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य देऊ नका. एव्हढे लोक आंदोलनाला साथ देतात म्हटल्यावर अहम येणारच. काही लोक म्हणतात कि अण्णांनी लोकपालाच्या आग्रह ऐवजी आहेत ते कायदे कठोरपणे राबवण्यासाठी चळवळ सुरु करायला हवी.पण अण्णा तुम्हीच सांगा हे कस शक्य आहे ? कायदे कठोरपणे राबवले तर लोकांना त्रास नाही का होणार ? त्यापेक्षा सरकारी बाबुना त्रास दिलेला केव्हाही चांगलाच नाही का ?
जय  हिंद ! by sanjay mane, shriwardhan