विचारी मना .......

Started by sanjaymane 1113, January 02, 2012, 10:05:32 PM

Previous topic - Next topic

sanjaymane 1113


                   रिकाम मन हे सैतानाचं घर असत अस म्हणतात. अर्थात हा सैतान दुसरा तिसरा कुणी नसून  केवळ विचार असतात. पण  विचार फक्त वाईट असतात अस कुठे असत. ? विचार हे अनेक प्रकारचे असतात. काही विचार चांगले असतात.काही वाईट.पण त्यातही गम्मत आहे. चांगल्या आणि वाईट विचारांमधेही फक्त आपल्यासाठी चांगले ,किंवा आपल्यासाठी वाईट असाही प्रकार असतो. आणि आपल्यासाठी चांगले असलेले विचार दुस-या  साठीही  चांगले असतीलच असे नाही. अगदी त्याच्या उलट आपण दुस-यासाठी करत असलेला वाईट विचार आपल्या दृष्टीने चांगलाच असतो की. अगदी खर सांगायचं झाल तर प्रत्येक वेळी या चांगल्या -वाईट विचारांमध्ये आपल्याला नेमका फरक करताच येत नाही.आणि त्याच कारण स्वार्थ हेच असत. प्रत्येक विचाराचा  आपण आपल्या हिताच्या दृष्टीने अर्थ लावत असतो. अथात हि मानवी प्रवृतीच आहे. असो. पण या चांगल्या आणि वाईट विचारांशिवाय  आणखीहि काही विचार आपल्या मनात येत असतात. या विचारांचा आपल्या आयुष्याशी संबंध असतोच असे नाही. कित्येक वेळा हे विचार विधायक ठरतात तर कधी विध्वंसक. रिकाम्या मनाला आपण सैतानाच घर म्हणतो तेव्हा आपण केवळ या विध्वंसक विचारांनाच विचारात घेतो. थोर शास्त्रज्ञ न्यूटन जेव्हा झाडाखाली नुसताच पडून खाली पडणा-या  सफरचंदाचा विचार करत होता तेव्हा त्या विचारांनी विधायक रूप घेतल आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला .हे सगळ लिहिण्याच कारण हेच की माझ्याही मनात असेच विधायक विचार येत राहिले आणि मला एक नवीन शोध लागला.
   रिकाम मन हे देवाचं घरसुद्धा  असत.!
------------संजय माने, श्रीवर्धन