असे का बरे होते ?

Started by harsh joshi, January 03, 2012, 05:09:34 PM

Previous topic - Next topic

harsh joshi

असे का बरे होते ?
असे का बरे होते ?
मनातल्या भावनांचे
ओठावर येणे राहून जाते
खुप असते सांगायचे
पण बोलायचे राहून जाते
कोणास ठावुक
असे का बरे होते ?
गुंफुनी हात हाती
तिच्या साथीने दूर जावे
तिचे पाहुनी गोड हसणे
मग चालणेच राहून जाते
कोणास ठावुक
असे का बरे होते ?
छेडूनी प्रिततराणे
तिच्या साथीने गुणगुणावे
तिचे ऐकुनी शर्मिले अस्फुट गाणे
मन गीत विसरून जाते
कोणास ठावुक
असे का बरे होते ?

-हर्ष जोशी-

walkoligopichand@yahoo.in

Harsh, tujhi kavita manala sparsh karnari aahe !
Aani ho tujhya kavitetil uttar tulach shodhayache aahe !

Pravin5000


d41080

Tumchya kavitela uttara dakhal ek kavita pathvat ahe .... tumchi kavita itki sundar ahe ki ti vachun mala je kahi suchle te reply mhanun pathvat ahe .... gustakhi maaf ...

Devyani ----

भावना मनीच्या सांगण्यासाठी
शब्दांची गरज का कधी लागते
प्रेमाची एक नजर तुझी तुझा अंतरंग सांगून जाते

तिच्या हाती हात गुंफून चालताना
पाय तुझे जरी थांबले
मन पिसाट वाऱ्यासारखे तिच्या सोबत आकाशी उडाले

शर्मिले अस्फुट गाणे तिचे
ऐक मानाने जरा
तुझ्या मन गीता चे बोल ऐकू येतील तुला


Pravin5000