समलैंगिकता....

Started by amitunde, January 03, 2012, 09:52:50 PM

Previous topic - Next topic

amitunde




 

समलैंगिकता....

घडलंय काय नि बिघडलंय काय
उपदेश सोडून आपण केलंय काय
वासनेला प्रेम नि समलैगीकाना अनैतिक म्हणताना
थोडा विचार आपण कधी तरी केलाय काय
घडलंय काय नि बिघडलंय काय.........

नाही हा आजार, नाही हि विकृती
तरीही समाजाने नाकारली यांची स्वीकृती
मनाच्याच अवस्थेचा हा एक अजब प्रकार
समजू नका तरी त्याला मानसिक विकार
सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय काय
घडलंय काय नि बिघडलंय काय ...........

पौगंडावस्थेत असताना पडत वाकड पाऊल
मानसिक व भावनिक आधाराची लागते त्यांना चाहुल
नकळत लैंगिक संबंधांची घडते हातून भूल
अडकतात यातच जस चिखलात रुतलेल प्रणयाच फुल
आजुबाजूच वातावरणही जबाबदार असत याची कधी कल्पना केलीय काय
घडलंय काय नि बिघडलंय काय ....

अशा व्यक्तींपासून चार हात लांब रहाव
मित्र-मैत्रिणींशी शारीरिक अर्थाने जवळ न जाव
मोह कितीही झाला तरी शरीरसंबंध टाळाव
आवाक्याबाहेर जात असेल तर पालकांशी बोलाव
मन मोकळ करायला आणि समस्या मांडायला धजावाताय काय
घडलंय काय नि बिघडलंय काय ....

निरोध न वापरल्यास यातूनही एड्स होऊ शकतो
प्रबळ इच्छा दाखविल्यास कोणीही बाहेर पडू शकतो
योग्य समुपदेश व डॉक्टरांची मदत घेऊ शकतो
ओषध, संयम आणि चिकाटीने यावरही मार्ग निघू शकतो
थोडस मनावर नियंत्रण तुम्ही मिळवू शकता काय
घडलंय काय नि बिघडलंय काय ....

कायद्यान बर्याच ठिकाणी यांना नाकारलं
सामाजिक पैलूवर चर्चा करण्याच धाडस कुणी न दाखविलं
मिळेल तसं, वाट्टेल तसं ब्ल्याकमेल करून लुबाडलं
सहानुभूती दाखविण्यासाठी कोणी नाय धजावल
प्रश्न यांचे सोडविण्यासाठी आपण सुरुवात करूया काय
घडलंय काय नि बिघडलंय काय ....

मित्रानो, समलैंगिक असण्यास काही विशिष्ठ कारण असतात...त्यांच्याकडेही माणुसकीच्या नजरेतून बघा....

अमित सतीश उंडे


केदार मेहेंदळे

खूप छान विचार मांडले आहेत. ह्या गोष्टीकडे बघायचा समाजाचा दृष्टीकोन बदलायला हवाय

amoul