मुंगीचे दात जशी परात....

Started by balrambhosle, January 03, 2012, 10:42:02 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

मुंगीचे दात जशी परात....

मुंगीचे दात जशी परात....आणि परातीच्या मागे कुत्र्यांची वरात ..
मुंगी ला चढला माज.. मग कुत्र्यांना पण सुटली खाज..
मग आता बसा शेपटी हलवीत ..
आपल्याला येतंय तरी दुसरे काय ..फक्त चाटायला मुंगीचे पाय ..

आता कसे कसे हे प्राणी मुंगीचे शिकार होतात ते बघा..
१)हत्ती:
मुंगिनी दिली टक्कर आणि आमच्या हत्तीला पण अल्ली चक्कर..
प्रेमात पडला हत्ती.. आणि विझली कॉलेज ची बत्ती..
हत्तीने केली लग्नाची मांग...
आणि म्हणाल मुंगी उत्तर संग..
ऐकण्यासाठी हत्तीने पुढे केला त्याचा कान..
आणि मुंगी सोडला "नो" चा बाण..
हत्तीची जिंदगी झाली घाण..
२) उंट.
मग आली उंटाची बारी ..पण उंटाची मान जरा जास्तच वरी..
कधी खाली करी तर कधी वरि..बिचारा रोज कॉलेज ला मारी फेरी..
पण मुंगी.. ती मुंगी ...हो हो तीच मुंगी लई भारी..
तिने केलि त्या उंटाची गावो गावी वारी...
शेवटी उंटाने लावला मुंगीला फोन .
अन .मुंगी म्हणते अरे बाबा तू कोण?
यात ..मुंगीचा झाला चांगलाच थाट.
.पण बिचाऱ्या उंटाची लागली चांगलीच वाट..
शेवटी उंटाने सोडला मुंगीचा नाद .
.आता उगाच घालतोय फेसबुक वर वाद..
3) रोमिओ (उर्फ ब्लैक मंबा)
याचे नाव होते ब्लैक मंबा ..
याला आवडला होता मुंगीचा आंबा..
एकदा याने म्हटले मुंगीला थांबा..
आणि म्हणाला तूच माझी रंभा...
लगेच मुंगीने घातला त्याच्या डोक्यात खांबा..
आणि बेशुद्ध पडला रस्त्यावर लंबा....
आणि उठून  मारतोय मोठ्या बोंबा..
मुंबाचा उठला वास..त्याने मुंगीचा सोडला ध्यास..

३) उंदीर (उर्फ कालू)
(मग ऐका मित्रांनो..तुमचा लाडका आवडता..उन्दिर...काय करतो..)
.मुंगी पुढे करून वाका वाका...त्याने लावला मुंगीच्या मैत्रिणीशी टाका.
पण मुंगीची मैत्रीण लय चालू.. .. तिने बनवला त्याचा कालू..(तिच्या नवीन कुत्र्याचे नाव )
(आणि आपली मुंगी ..ती तर मुंगीच कशी गप्प बसणार..
आणि बघा ती कालू ला कशी कशी डसणार...मुंगी काय म्हणते..
कालू ए कालू .. माझी पेन संपली ..माझी वही संपली
माझी लीपिस्तिक पण संपली आणि पोवडेर पण संपले रे..
आणि माझ्या शिवाय तुला कोण आहे दुसरे..हे हे.. )
हे सगळे जर मला आणून देशील.
.तर तूच चायनीज बिल्ली.ची  पप्पी घेशील ..
नाहीतर आलास तसा परत वाऱ्यावर उडत जाशील....
कालूची चड्डी चांगलीच फाटली .
.कारण मुंगी त्याला जवळची वाटली ..
उंदराचा राहिला उपाशी .
आणि मुंगी खेळली तुपाशी..(एक म्हण)
शेवटी उंदीर मुंगी पुढे जावून झुकला
आणि इथेच तो संपूर्ण चुकला...
अशी मुंगी ने टाकली कालूच्या अंगावर कात...
आणि दाखवले तिचे असली अवर्णनीय फेन्ग्डे दात...

(दात बघून कालु घाबरला, घामाघूम झाला..
त्याने हे कधी बघितलेच नवते. मग काय झाले बघा.....)

3)  माकड (उर्फ चालू )
पोवडेर आणायला गेला कालू...
आणि तिथे त्याचा मित्र भेटला माकड चालू..
चालुने आणि कालू ने समान घेतले..
आणि मुंगी पुढे नेऊन ओतले...
तेव्द्यातच मुंगीने चालूला बघितले..

बघतच मुंगीला झाले चालू  वर प्रेम..
तिने डोळ्याने धरला चालू चा नेम ..
तिने लगेच मारला त्याला डोळा..
आला चालूच्या पोटात खुशीच गोळा..
चालू पण हसला कालू पण हसला..
हे बघून मुंगी पण हसली...  (आता .घ्या केळ मुंगी हसली...परत हसली कि हो..)

हसताक्षनीच वाजला मुंगीचा गेम..
अन चालूच गेला तिच्या दातावर नेम...

चालू पण घाबरला, घामाघूम झाला..
त्याचीपण चड्डी फाटली, जशी फुटते दारूची बाटली..
मुंगीच्या डोक्यावरचे बघून  टक्कल..
चालूला पण घडली चांगलीच अक्कल...
जशी जशी मुंगी जवळ आली..
तशी तशी चालूची चड्डी झाली.ओली ..
मुंगीला म्हणतो दूर हो बाई..
तू तर माझी लाडकी ताई..
चालुने लावला मुंगीवर डाग..
अन मुंगीला आला भलताच राग..

(पण तुम्हाला तर माहीतच आहे..मुंगीचे दात जशी परात..)

मुंगीने घयाचा ठरवला सूड...
आणि तोडले तिने कालू चे पण बुड..
बंद करून कालूचा वाका वाका.
तिने तोडून टाकला त्याच टाका..
(मुंगीने ठरवले काय???. बघा तिने काय केले..)

पांढरया केसांना लावून काळी डाय....
मुंगीने आणली चीव्ळी गाय...."(बारीक धड मोठ तोंड..)
चीव्ळी गायीचे होते बोचरे दात..
हसताना ठेवते..तोंडावर हात...
मग चालुने बघितली चीव्ळी गाय..
चालू निघाला चाटायला पाय..
कालू कडून शिकून वाका वाका..
अन लावाया लागला गायीवर टाका..

.चालू ला पटली बोचरी गाय..
अन कालुला पण भेटली ढब्री साय...
मुंगी आता पश्चातापात हाय...(कुणाच्या तर उंटाच्या..)

एकटी थकलेली लाचार मुंगी..वेडी झाली..
आणि मदतीसाठी lion किंग्स कडे आली..

(साहेब, मी लुट्गायी बरबाद होगई..
मला वाचवा. मला लोक म्हणतात ताई..
किंग्स: काय झाल तुला बाई..
तुला कोण म्हणाले ताई...)

मी दिसत असून सुंदर बाई..
माकड पण म्हणते मलाच ताई.
अन..माझी रानात शिरली बोचरी गाय..
माझ्या डोक्यावर पडला तिचा फुटका पाय..
माझ्या दुधात पढली chinese बिल्ली..
आणि उंदराने चोरली माझ्या कपाटाची किल्ली...

किंग्स न तिचे डाव उघड दिसले..
आणि पाच राजा मनातच हसले...

लगेच त्यांनी तोडली मुंगीची परत..
आणि सोडले तिला उंटाच्या घरात..
मुंगी पण झाली खूपच खुश..
अन उंट पण करू लागला हुश हूश..

तर मित्रांनो हि कविता..कुण्याही व्यक्ती शी कसल्याही प्रकारचा संबंध घडवून आणत नाही. ह्या सर्व घटना काल्पनिक आहेत..आणि जर का कुणाशी याचा संबंध आढळून  आला..तर कृपया तो योगायोग समजावा..आणि त्यासाठी आम्ही म्हणजेच कवी त्या बाबी साठी बिलकुल जवाबदार राहणार नाही..

तुमचाच आवडता मित्र
बळीराम शिवाजीराव भोसले

Pravin5000


केदार मेहेंदळे

kay dhmal aahe yaar.... khup maza aali kavita vachtana.... kavita janu kahi bharud aahe... khup chan.


प्रतिक

रोमियो:-मुंगी चा आंबा आवडला