आयुष्याचे कोडे

Started by शिवाजी सांगळे, November 10, 2025, 05:58:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आयुष्याचे कोडे

कोडे आयुष्याचे अताशा उलगडते आहे
पुन्हा फिरून त्यातच का गुरफटते आहे

भ्रामक पसारा जगण्याचा कळू लागता
ओढीने त्याच्या उगाचच फरफटते आहे

विना स्वार्थ का बोथट सारे जीणे इथले
साधण्यास स्वार्थ केवळ तडफडते आहे

उपभोगून सौख्य सगळे स्व-काळातील
खोंड जुने नव्यांच्या मधे कडमडते आहे

थांब म्हणते शरीर आता वार्धक्याकडले
ऐके ना मन, जे सत्तेसाठी सरपटते आहे

जोपासावी कुठवर लालसा अन् वासना
देह कुडी जेव्हा काठीसंगे लटपटते आहे

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९