हे बघ प्रिये मी असाच आहे

Started by balrambhosle, January 04, 2012, 12:22:43 AM

Previous topic - Next topic

balrambhosle

हे बघ प्रिये मी असाच आहे...
जसा दिसतो तसाच आहे....
आवारी म्हण वा टपोरी म्हण...
किंवा तू खातोस सुपारी म्हण..
तू काही हि म्हण..पण मी असाच आहे
जसा दिसतो तसाच आहे..
पागल म्हण व वेडा म्हण..
जुआरी म्हण व बेवडा म्हण..
कॉलेज ची घाण म्हण..
वा तंबाखुच पान म्हण...
मी असाच आहे
जसा दिसतो तसाच आहे,..
तंबाखू माझी सुटणार नाही..
बोतल माझी फुटणार नाही..
हृदय माझ फाटणार नाही..
आणि मागे मी हटणार नाही..
कारण मी असाच आहे
जसा दिसतो तसाच आहे..
माझा रंग काळा म्हण
वा चिखलाचा गोळा म्हण
मधावारची माशी म्हण..
वा कॉलेज चा चपराशी म्हण
प्रिये मी असाच आहे
जसा दिसतो तसाच आहे..
भावना माझ्या झाक्णार नाही..
कुणा पुढे वाकणार नाही..
शिव्या देशील तर शिव्या खाईल..
वाटलाच तर माझा जीव जाईल..
पण प्रिये मी असाच आहे..
जसा दिसतो तसाच आहे..
पिसाळलेला कुत्रा म्हण..
वा कुत्र्यान समोर भित्रा म्हण
विषारी काळा नाग म्हण
वा जंगलातला वाघ म्हण..
सखे मी असाच आहे
जसा दिसतो तसाच आहे...
एव्हड वाचून निर्लज्ज म्हण..
मारखाण्यासाठी सुसज्ज म्हण...
पण काहीही असो
आणि प्रिये मी असाच आहे..
जसा दिसतो तसाच आहे...
कवी: बळीराम भोसले


Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in