तू ......

Started by salunke.monika, January 05, 2012, 03:28:19 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

आज तुला पाहिलं अन
क्षणभर पाहतच  राहिले
जुन्या आठवणीतील क्षण
जणू आपोआपच समोर दिसू लागले

कडू- गोड आठवणीनी तर
मनाला घेरूनच टाकले
काहीही न बोलता हि
नयन मात्र हे भरुनी आले

मान्य आहे मीच होते
जबाबदार त्या घटनेला
तुझ्या माझ्या नात्यातील 
रेशीम  बंधांची वीण सोडायला

कस समजावू आता मी तुला
माझ्यावरही होता अधिकार कोणाचा
नव्हते तोडायचे आपले प्रेमाचे नाते
पण रक्ताच्या नात्यासाठी त्याग करावा
                              लागला सर्वस्वाचा

समजून घे न तू हि थोडफार
सगळीच नाती नाही घेत आकार
तुझ माझ हि आगदी तसच होत
त्यामुळेच तर स्वप्ने झाली नाहीत साकार

मी कोणाची तरी झालेली पाहताना
तू खरच आहेस खूप दुखावला
आता एकाच मागणे आहे देवाकडे
तुझ्या प्रेमात नाही पण द्वेषात तरी स्थान मिलो मला 

आपल्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते
मला कधी दुखवायचे नव्हते तुला
माझ्या साठी तर तूच  होतास
सर्वस्व माझ्या ह्या जीवनातला

तुझ्या शिवाय हे जीवन कंठणे
अशक्यच आहे मला
पण तुला माझ्याशिवाय एकदातरी
सुखी होताना पाहायचं मला 

                              (मोनिका साळुंके )

mahesh4812


MK ADMIN

excellent !! phar chana ahe.

केदार मेहेंदळे


Santosh Dhonde

कस समजावू आता मी तुला
माझ्यावरही होता अधिकार कोणाचा
नव्हते तोडायचे आपले प्रेमाचे नाते
पण रक्ताच्या नात्यासाठी त्याग करावा
                              लागला सर्वस्वाचा

समजून घे न तू हि थोडफार
सगळीच नाती नाही घेत आकार
तुझ माझ हि आगदी तसच होत
त्यामुळेच तर स्वप्ने झाली नाहीत साकार


khupach chan

Rupesh Naik

पण तुला माझ्याशिवाय एकदातरी सुखी होताना पाहायचं मला  ...... :(


समजून घे न तू हि थोडफार सगळीच नाती नाही घेत आकार तुझ माझ हि आगदी तसच होत त्यामुळेच तर स्वप्ने झाली नाहीत साकार.... :(  खूपच चं जमलीये तुला....

Walkoli Gopichand

Kharach premakade pahnyach tujha drushtikon khup changla aahe !
Ashach kavita lihit ja Monoka !

vinod MESHRAM

I am very happy to write u because your poem is very heart touching.Hope that u go ahead.From last some year i would try to wrote some poem but never be possible due to my sea shore jobs.right now I am writing note for you present  GULF.<PORBANDAR SEA>HOPE that god give you strength to write to you. HAVE A GREAT DAY

vinod MESHRAM


snehal p

khup sundar kavita aahe.
mala ekach vicharayche aahe he ayushya tu jagali aahes ka monika.?
ha tras tula jhala aahe ka?