बाबा....

Started by salunke.monika, January 05, 2012, 04:35:23 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

राजा-राणीच्या संसारातील राजाच ते
पण माझ्यासाठी फक्त माझे  बाबाच आहे ते

छोटुशी बाहुली पाहून झाले  होते  खूप आनंदी
मलाच सर्वस्व मानून उडू लागले होते स्वच्छंदी

बाबा बाबा म्हणत माग फीरण काम होत माझ
माझे लाड पुरवणे हेच स्वप्न होत त्याचं

हातांचा झुला करून झुलवले आहे त्यांनी  मला
माझ्यासाठी एक खेळणे बनवले होते स्वतःला

त्यांची  ती मऊ मांडी गादिहून छान मला भासली
माझ्यासाठी तर ती हक्काची जागाच होती बनली

नव्हते लादले कधी त्यांनी ते आपेक्ष्यांचे ओझे
तेच नेहमी माझ्यासाठी होते खूप मोठे

माझ्यासाठी रात्रंदिवस ते झिजले आहेत  नेहमी
स्वतःचे सुख ठेऊन पहिले मला पाहीले आहे त्यांनी

दमून भागून आले  तरी जवळ घ्यायचे ते मला
आईच्या रागापासून वाचवण हेच काम होत त्यांना

माझ्याशिवाय कधी जेवले  नाही ते
मला झोपवूनच मग झोपले नेहमी ते

एकाच नेहमी चिंता जाणवत आसते त्यांना
सासुराला मी गेल्यावर आठवतील का ते मला

कस सांगू आता मी  त्यांना............

मातीच्या ह्या गोळ्याला आकार तुम्ही  दिला
तुम्हाला  विसरणं आता अशक्यच आहे मला

बाबा तुम्ही  हे करा  बाबा  तुम्ही ते करा आसते मी नेहमी म्हणत
मी गेल्यावर तुम्ही  एकटे  पडू नये हेच आसत त्या मागच कारण

काळजी नका करू तुम्ही ,तुमची   बछडी आहे खूप हुशार
जीवनातील आव्हानांना तोंड देण्या घेणार नाही मी माघार
                                                                                             (मोनिका)


केदार मेहेंदळे

खूप छान... बाबां करिता मुलगी हि विशेषच असते.  खूप छान कविता आहे.

salunke.monika


sunita pandit


balrambhosle

mast............babachi ladki mulgi....

bharat juwar


bharat juwar


amoul


Nilesh Bhong


Ram.potale

:) :) :)खुपच मस्त आहे.....hats off to poet