असे वाटते...

Started by rudra, January 06, 2012, 01:11:02 AM

Previous topic - Next topic

rudra

असे वाटते...
वाऱ्यासोबत अल्लड होऊनी जावे
अन दिसता साऊली,
सुके रान होऊनी जावे.
असे वाटते...
ढगांसवे पाऊस होऊनी जावे
अन भिजता अंग,
अळवाचे पान होऊनी जावे.
असे वाटते...
गवतावरले दव होऊनी मोहक...
अन शहारता मन,
पात्यांशी बिलगून यावे.

                       -रुद्र

केदार मेहेंदळे


rudra

abhari ahe kedar................... :)
kahi chuka aslya tar nisankochpane sanga.................... :)