प्रेम आणि मैत्री

Started by salunke.monika, January 06, 2012, 01:55:53 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

भावना मनापाखाराची
शब्दाविना उमलून यावी,
साद देता प्रेम व्हावे
प्रतिसाद अन मैत्री खुलावी.......
प्रेम मैत्री दोन भाव
अर्थ ज्यांचा भिन्न व्हावा,
मैत्रीच्या सागरास जेव्हा
प्रेमाचा किनारा मिळावा....
तर्कशक्ती एकत्र यावी
अन जशी मैत्री बनवि,
दोन हृदयांचा मिलाप अन
प्रेम भावना मनी रुजावी....
प्रेम होते एकदा 
मैत्रीस काही बंध नाही,
प्रेमात मैत्री शक्य आहे
मैत्रीत प्रेम अपवाद नाही......
ईश्वराने प्रेम दिले
आनंद भोगण्यासाठी,
मैत्रीचा आधार दिला
हे दुख सोसण्यासाठी ........संदिप