घुसमट......

Started by salunke.monika, January 06, 2012, 02:10:49 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

आज मी तिला सगळ सांगणार होतो
मनातील घुसमट अलगद मांडणार होतो
प्रेमात वेडेपणाची मर्यादा मी
आज तोडणार होतो.......
वाटले होते प्रेम व्यक्त कराव
तिच्या सहवासात मनसोक्त जागाव
तिला माझ्यात सामावून घ्याव
आणि स्वतः तिच्या हवाली व्हाव
पण रात्रभर मी विचार केला
जर ती नाही म्हणाली तर?????
प्रेमाचा स्वप्नमहाल
बनण्या आधीच कोसळला तर??
असे वाटते तिच्या मनात काय आहे
याची चाहूल घ्यावी
तिलाही प्रेम व्यक्त करण्याची
एक संधी द्यावी
मला ती आवडते
हा माझा स्वार्थ आहे
तिला मी आवडत नसेल कदाचित
तिचा विचारही सार्थ आहे .......
म्हणून मग मी ठरवले
काहीच बोलायचे नाही
प्रेम गमवावे लागले तरी चालेल
पण मैत्री गमवायची नाही.......