अजून पण आठवतंय..

Started by balrambhosle, January 06, 2012, 06:40:53 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

चार वारशाच ते चक्री वादळ..
आणि आमची झालेली धांदल..
अजून पण आठवतंय..
पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस..
तो हरून भाई चा चहाचा गाडा..
जिथे पहिल्याच दिवशी केला मी राडा..
कुणाची ओळख न कुणाची साथ..
मग हीच असते मैत्री ची सुरवात..
अशीच रोज चहा आणि दिवस संपवत..
मला भेटली चार मित्रांची संगत..
ती पण माझ्यासारखीच भोळी आणि वेडी..
आणि त्यांची गावे पण होती जशी लहान खेडी..
कोण जाने कसे जुडलो आम्ही.
पण एकमेकांशी खूप खूप लढलो आम्ही..
रोज होणारच आमच भांडण..
आणि होणार आमच रोज खंडन..
यान आम्हाला खूपच जवळ खेचलं..
आणि त्यासाठी आम्ही खूप काही वेचलं..
ते वेडे उनाड गोल फिरणारे दिवस..
आणि त्या हरवलेल्या अंधाऱ्या रात्री..
त्या कोरड्या उजाड झालेल्या वाटा.
प्रत्येक  वळणावर फुटणारा फाटा..
ते क्लास बुडवून वेड्या सारख फिरणं ..
आणि परीक्षेच्या राती अंग अंग जीरन..
मग परीक्षा संपायच्या..
आणि आमच्या कुस्त्या जुम्पाय्च्या ..
मग रात्री व्हायची धम्माल..
आणि हीच आमची सर्वात मोठी कमाल..
मला आणखी पण आठवतय..
आणि रोज मला रडवताय..
हीच आमची पाच जणांची मैत्री...
जी कधीच तुटणार नाही आहे आम्हा खात्री........

__ बळीराम भोसले...

balrambhosle

डिग्री चे चार वर्ष..
हाच जीवनातला खरा हर्ष..
ते वेडे उनाड गोल फिरणारे दिवस..
आणि त्या हरवलेल्या अंधाऱ्या रात्री..
त्या कोरड्या उजाड झालेल्या वाटा.
प्रत्येक वळणावर फुटणारा फाटा..
ते क्लास बुडवून वेड्या सारख फिरणं ..
आणि परीक्षेच्या राती अंग अंग जीरन..
तो हरून भाई चा गोडचीट . चहा..
आणि पीत पीत पोर्रींना पहा..
काय मज्जा यायची ना..
किती स्वप्न बघायचो ...
आणि वाऱ्यावर उडायचो
त्या गारठलेल्या थंड्या..
आणि अंगावरच्या बंड्या..
सगळ पाणी पाणी व्हायचं...
पण त्यात पण मन रमायचं..
आजपण ते आपल्याला आठवतंय..
आणि मन डोळ्यात अश्रू पाठवतंय..