जमल नाही,

Started by DIGA, January 06, 2012, 10:22:11 PM

Previous topic - Next topic

DIGA

फुलासारख फुलायचं होतं जमल नाही
मनासारख जगायचं होतं जमल नाही,

सुखाच्या सरीमधे दव बणून ओघळतांना
पानाफुलात झुलायचं होतं जमल नाही,

स्वप्नाच्या वेलीवर वेडं मन अल्लळतांना
मनापासून हसायचं होतं जमल नाही,

दू:खाणीं होरपळुन जग अवघे काजळतांना
दिव्यांसारख जळायचं होतं जमल नाही,

प्रीतीचे रंग तुझ्या डोळ्यात गधळतांना
खुळयासारख बघायचं होतं जमल नाही,

अंधाराची चादर अंगावर ओळुन
जगापासून लपायचं होतं जमल नाही,

मनातील दू:ख आतल्याआत वादळतांना
तुझ्या कुशीत रळायचं होतं जमल नाही,

                        DJ