कुठे हरवले आपल्या स्वप्नातलं सुख .........शोधायचंय का ....??????

Started by महेश मनोहर कोरे, January 10, 2012, 12:01:25 AM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

तुम्हाला आयुष्यातलं सुख अनुभवायचं असेल तर एकच गोष्ट करा....


एकदा कधीतरी कामात असताना ,कुठेतरी गडबडीत जाताना ....अचानक एक पावसाची सर येईल ....
तुम्हाला प्रेमाने बोलवेल , पण आपण मात्र आपल्याच घड्याळी चक्रात असू ...
काय हा पाऊस..? अचानक आला अन कामाचा खोळंबा केला ...

अरे.....!
मग सुख काय सांगून येत काय ....?
फक्त एकदा त्या सरीमध्ये न्हाऊन या ...
लोक वेडा म्हणून समजतील पण मन आनंदाने हर्षून उठेल
मग महत्वाच काय ....लोक कि मन....?

थंडी सगळ्यांनाच आवडते ....त्या थंडीतला गारवा हि आवडतो........
मग सकाळी उठण्याचा कंटाळा कशाला.... ? ....त्या थंडीपेक्षा गरम दुलई भावते.....का ?
याचा कधी विचार केला आहे का ....?
नसेल तर मग निसर्गाच्या या अफाट कृतीला आपण पात्र आहोत का ?

आहोत तर मग खऱ्या थंडीची मजा कशी येणार ...
अनुभवायचं असेल तर फक्त एकदा पहाटे ५ ला उठून  बागडणाऱ्या धुक्यांसोबत,
वेड्या पानांच्या शांततेसोबत मनाची घुसमट विरघळून तर बघा ...

बघा रे हा सुंदर निसर्ग ....अन त्याच्या जीवनप्रीती ...
घडवतोय आपल्याला ,घ्या ते अमृत स्वप्नामिती ................


                                                  महेश मनोहर कोरे
                                    पुणे. [/color]


महेश मनोहर कोरे


महेश मनोहर कोरे

नशीब अन सुखाची कुठेतरी गाठ मारलेली असतेच ...नाही का ?...

महेश मनोहर कोरे

सुखाचे आयुष्य जास्त कि दु:खाचे कमी.............?