काळोख

Started by sharktooth19, January 10, 2012, 11:51:35 AM

Previous topic - Next topic

sharktooth19



भयाण काळोखात सावल्यांशीही नातं संपतं
चंद्रही एकटा एकटा..
अंधूक चन्द्रकिरणात अधिकच विचित्र दिसणारी झाडे
उंच टेकडीवर चमकणारा एकच दिवा,
थंडगार वारा...
पण तरी सर्व कसं निर्वात
शांततेने कुशीत घेतल्यासारखा
पण झोप मात्र कुठेच नाही
गाडीचा वेग..
इंजिनाचा आवाज..
लोकांचा आवाज..
येणारे नि जाणारे..
पण तरीही एकाकी..
मग आठवण..
कोणाचि?
या वेळी जो आठवतो
तोच खरा सोबती..
कारण आठवणिंमध्ये सोबत करण्याची त्याचीच सवय..

केदार मेहेंदळे


8087060021

#2
NICE POEM