प्रिती

Started by kishorayan, January 10, 2012, 03:56:48 PM

Previous topic - Next topic

kishorayan

मृगजळामागे धावणाऱ्या हरणालाही
पाय थकण्याची भीती आहे
झिडकारते ती मला
तरीही तिच्यावरच प्रिती आहे

कमळावर पडलेल्या दवाला जसा
रंग असतो आकाशाचा
निबिडात फसलेल्या माझ्या प्रेमाला
शोध आहे प्रकाशाचा

थेंब थेंब पावसातन जस
अथांग जलसागर साचत
आठवण येता तुझी
मनमुराद रडावं वाटत

मन अगदी कोंडून गेलय
पण कोणालाही कळत नाही
कसे कळणार कोणाला
रडणार र्हुदय आसव गाळत नाही

स्वरचित:-- किशोर तेलगावे

Dilip Deshmukh

सुंदर , फारच सुंदर !

8087060021

#2
NICE