प्रवास

Started by sharktooth19, January 13, 2012, 07:33:01 PM

Previous topic - Next topic

sharktooth19


सरळ रस्ता होता
एकटाच मी चालणारा
झपाझप पाउले टाकत
मुक्कामी पोहोचण्याची घाई
एकही वळण नाही
चढाव नाही
उतारही नाही
खाचखळगे नाहीत
मऊ गालीचेही नाहीत
काटे नाहीत नि फुलेही नाहीत
चौक नाही
की साधा दुरस्ता ही नाही
मन कुठेच गुंतले नाही
वाटेत जाणारे मिळाले
येणारेही मिळाले
सोबत चालणारी  फक्त तूच
आता वाटेत सगळ आहे
चढाव, उतार, वळण, फूल, काटे
कदाचीत माझे डोळेच आता उघडले
आणि म्हणूनच मुक्कामी जाण्याची घाई नाही
तू येता प्रवासच सुखकर झालाय..

Roopali